
प्रतिनिधी /वसई
खेळाडूच्या पाठीवर पडलेली शाब्बासकीची थाप आणि त्याला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक (कोच) यांच्या एकत्रित प्रयत्नातूनच क्रीडा क्षेत्राचा पाया मजबूत होतो. नेमका हाच धागा पकडत, अग्रगण्य क्रीडा संस्था ‘व्हीएव्हीए ग्रुप्स’ (VAVA Groups) चा ‘फाऊंडर्स डे’ (वर्धापन दिन) ३० जून रोजी मोठ्या उत्साहात आणि कृतज्ञता भावनेने साजरा करण्यात आला. या खास दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या प्रगतीचे खरे शिलेदार असलेल्या प्रशिक्षकांचा विशेष गौरव करण्यात आला.एक दूरदृष्टी किंवा ध्येय कितीही मोठे असले, तरी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी एका मजबूत आणि समर्पित संघाची गरज असते. ‘व्हीएव्हीए’ परिवाराने आजवर गाठलेले प्रत्येक शिखर आणि मिळवलेले यश हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या प्रशिक्षकांमुळेच शक्य झाले आहे.
या सोहळ्यात संस्थेच्या यशात मोलाचे योगदान देणाऱ्या खालील शिलेदारांना सन्मानित करण्यात आले:
- फिनॉमिनल कोचेस (Phenomenal Coaches)
- असिस्टंट कोचेस (Assistant Coaches)
- इंटर्न कोचेस (Intern Coaches)
