नालासोपारा (घनश्याम आंबोकर): बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र. ५५८, आदर्श महिला मंडळ आणि सुप्पारक बुद्ध विहार कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास निमित्त पवित्र ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन व श्रावण पौर्णिमेचा विशेष कार्यक्रम गुरुवार, दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी सुप्पारक बुद्ध विहार, लक्ष्मीबेन छेडा मार्ग येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ०६:०० वाजता प्रमुख पाहुणे व प्रवचनकार आयु. महेंद्र चाफे यांच्या शुभहस्ते बुद्ध प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनं करण्यात आली. त्यानंतर उपस्थित प्रवचनकार व मान्यवर बौद्धाचार्य यांच्या मंगलमय वाणीतून त्रिरत्न वंदना व सूत्रपठन पार पडले.

शिक्षणाचे महत्त्व आणि आंबेडकरी संघर्ष कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले प्रवचनकार तथा ‘कोकण रत्न पुरस्कार’ सन्मानित आयु. महेंद्र चाफे यांनी धम्मदेसना देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी शैक्षणिक संघर्षमय प्रवास आणि आधुनिक भारताचे त्यांचे स्वप्न या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या ओघवत्या व प्रबोधनपर वाणीने उपस्थित उपासक-उपासिकांना मंत्रमुग्ध केले.

मान्यवरांची उपस्थिती आणि साहाय्य

  • आयु. सिद्धार्थ मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम पार पडला.
  • शाखेचे सचिव आयु. श्रीकांत वसंत मर्चंडे यांनी कार्यक्रमाचे नेटके व प्रभावी सूत्रसंचालन केले.
  • या बौद्धिक व धार्मिक कार्यक्रमासाठी बौ.प.स. शाखा क्र. ५५८ चे पदाधिकारी, सदस्य, आदर्श महिला मंडळाच्या भगिनी, विविध मित्र शाखा, संघटनांचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने उपासक-उपासिका व बालगोपाल उपस्थित होते.
  • कार्यक्रमात श्री. संजय पवार व परिवाराने खीरदान सेवा दिली. तसेच उपस्थित सर्व दात्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानून व अल्पाहारानंतर कार्यक्रमाची मंगलमय सांगता झाली.

हा कार्यक्रम बहुजन समाजात धम्मप्रसार, शैक्षणिक जाणिवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed