पर्वती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तिप्रदर्शन बैठक : पक्ष आढाव्यात जोशपूर्ण मार्गदर्शन

पुणे :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार गट) पर्वती विधानसभा मतदारसंघात पक्ष आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. पंडित कांबळे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “पर्वती मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला बनवणे हे आपले सामूहिक ध्येय असून, संघटनशक्ती आणि जनतेशी असलेला थेट संवाद हेच आपले यशाचे गमक आहे.”

या प्रसंगी पर्वती विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक मा. अंकुश (अण्णा) काकडे, विधानसभा अध्यक्ष मा. शशिकांत तापकीर, प्रदेश सरचिटणीस मा. भगवानराव साळुंखे, माजी स्थायी समिती अध्यक्षा मा. अश्विनी ताई कदम, अर्बन सेल पुणे शहराध्यक्ष मा. नितीन कदम, प्रदेश उपाध्यक्ष (सामाजिक न्याय विभाग) मा. मिनाक्षी शिंदे, प्रदेश सरचिटणीस मा. प्रमिला रणदिवे, सामाजिक न्याय विभाग पुणे शहराध्यक्ष मा. शैलेंद्र जाधव तसेच कार्याध्यक्ष मा. वैजनाथ वाघमारे यांची विशेष उपस्थिती होती.

बैठकीला पर्वती मतदारसंघातील सर्व सेलचे पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी निवडणूक रणनीती, मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न, नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या योजना आणि पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला.

सभा उत्कट घोषणाबाजी, जयजयकार आणि पक्षनिष्ठेच्या संकल्पांमुळे रंगतदार झाली. पर्वतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भक्कम पाठबळ मिळावे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज राहावे, असा निर्धार या बैठकीत घेण्यात आला.

ही बैठक येत्या महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय शक्तिप्रदर्शनाचा ठोस संदेश मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *