राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या पर्वती विधानसभा मतदारसंघात डॉ. डी. भास्कर प्रोफेशनल इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात आणि प्रचंड प्रतिसादात पार पडला.

कार्यक्रमास पर्वती विधानसभा अध्यक्ष मा. श्री. शशिकांत भाऊ तापकीरसामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. पंडित कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

🔹 प्रा. डॉ. संदीप दळवी सर यांनी “करिअर उड्डाण 2025” या विषयावर विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करत अनेक शंकांचे निरसन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणातून अनेकांना नवसंजीवनी लाभली.

🔹 मा. श्यामसुंदर दळवी सर (पुणे करिअर अकॅडमी) यांनी UPSC, MPSC, IBPS, बँक, रेल्वे, LIC स्पर्धा परीक्षा, तसेच पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण याविषयी सविस्तर माहिती देऊन युवकांना दिशा दिली.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रतिक पंडित कांबळे यांनी केले होते.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवर:

  • शैलेंद्रजी जाधव – शहराध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग
  • फारुख भाई शेख – कार्याध्यक्ष, पर्वती विधानसभा
  • आप्पा आरणे – संघटक सचिव, महाराष्ट्र प्रदेश
  • प्राजक्ताताई जाधव – शहराध्यक्ष, ग्रंथालय विभाग
  • विद्याताई ताकवले – महिला अध्यक्ष, पर्वती विधानसभा
  • अनुपमा ताई अवचिते – महिला अध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग पर्वती
  • गीतांजली ताई जाधव, समीर सय्यद, आदित्य साखरे, विनोद भाऊ हानवते, गजेंद्र चांदणे, अभिमन्यू कांबळे, दिनेश चव्हाण, हरीश खुडे व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *