
पुणे (प्रतिनिधी)- रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी पत्रकार भवन वाशीम येथे महत्वाची बैठक झाली या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा पंडित कांबळे यांनी मार्गदर्शन केले
या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीत आलेला निकाल आगामी काळातील पक्ष संघटनात्मक बांधणी नवीन मतदारा पर्यंत पोहचणे शासकीय योजना अल्पभूधारक शेतकरी शेतमजूर यांच्या समस्या जाणून त्यावर आवाज उठवने लोकांना भिडणारे प्रश्न मांडणे भारतीय संविधान विविध समाज घटकाकडे जावे लागेल लोकात मिसळावे लागेल वैचारिक लढाई लढावी लागेल या विषयावर विचार व्यक्त झाले
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समिती नगरपरिषद नगरपालिका निवडणुकी विषयी पूर्व तयारी करणे बाबत विचार विनिमय झाला
केंद्र सरकारने आत्ताच सादर केलेल्या बजेट मध्ये अनुसूचित जाती कडे दुर्लक्ष केलेले आहे आणि हे बजेट सामाजिक अन्याय करणारे आहे असे मत पंडित कांबळे यांनी मांडले
*या बैठकीचे सुंदर आयोजन सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष मा डॉ रमेश चंदनशिवे यांनी केले होते*
या बैठकीला वाशीम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा बाबाराव खडसे पाटील जिल्हा परिषद च्या मा अध्यक्षा मा ज्योतीताई गणेश पुरे मा संदीपजी गवई मा संजय गायकवाड मा मिनाक्षी शिंदे मा अरुणजी धर्माळे मा अरुण काळे मा बाबुराव खरात मा प्रमिला ताई रणदिवे मा वैशाली ताई मेश्राम ताई मा गजानन भटकर साहेब मा मिलींदजी गवई मा सुनील वाराने मा राजाभाऊ अवताडे मा सुधीर मनावर मा शामराव वाहूरवाघ साहेब मा कोकिळा ताई वाहूरवाघ मा नरसिंग उदगीर कर तसेच अनेक तालुक्याचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते!
