मीरा-भाईंदर, घनश्याम आंबोकर :

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष व माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने, मीरा-भाईंदर शहर जिल्हा अनुसूचित जाती-जमाती काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी रवींद्र बाबासाहेब खरात यांची निवड करण्यात आली आहे.​रविवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात खरात यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ही निवड केवळ पदाची जबाबदारी नसून सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी अधिक ताकदीने काम करण्याची मोठी संधी आहे. वंचित, शोषित आणि अनुसूचित जाती-जमाती समाजाचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे आणि पूर्ण निष्ठेने कार्यरत राहण्याचा संकल्प केला आहे.या निवडीबद्दल त्यांनी पक्षश्रेष्ठींचे तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विश्वास व सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांच्या या निवडीमुळे मीरा-भाईंदर परिसरातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed