बौद्ध व बहुजन समाजाची आपली हक्काची बँक असावी या संकल्पनेतून अस्तित्वात आलेल्या भारत सरकार मान्यताप्राप्त बुद्धिजम अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड या बँकेच्या नूतन शाखेचा रविवार, दि.१५ फेब्रुवारी २०२६ रोजी उदघाटन सोहळा विरार, मनवेलपाडा येथे बौध्द धार्मिक परंपरेने भदंत मग्गलायन महाथेरो यांच्या हस्ते पार पडण्यात आला.
सदर नूतन शाखेच्या उदघाटनाचे औचीत्य साधून बुद्धिजम अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड, संविधान प्रतिष्ठान व पी. डी. हॉस्पिटल, विरार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत चष्मा वाटप व आरोग्य शिबिराचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. या उपक्रमाचा शेकडो नागरिकांनी यावेळी फायदा घेतला होता.
सदर कार्यक्रमाला वसई विरार शहर महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. विशाल जाधव, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष लवेश लोखंडे, सुरेश लोखंडे, शिवसेना विरार शहर प्रमुख श्री. उदय जाधव, उप शहर संघटिका सौ. रोशनी जाधव, प्रा. प्रशांत बचूटे, क्रांती मित्र मंडळाचे अध्यक्ष सदाशिव वाव्हळ, भाजपाचे श्री. कैलास पाटील, श्री. अनिकेत घोरपडे, रिपाइच्या महिला अध्यक्षा सौ.सुवर्णा जगताप, सिद्धार्थ जागृती संघांचे श्री. अतुल मोटघरे व राष्ट्रीय पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोज खाडे तसेच इतरही मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
बौद्ध समाजातील युवकांबरोबर इतरही बहुजन समाजातील युवकांनी स्वतःचा यशस्वी उद्योग उभारावा याकरीता बुद्धिजम अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड या बँकेच्या माध्यमातून बौध्द समाजाप्रमाणे इतरही बहुजन समाजातील महिला व होतकरू उद्योजकांच्या नवीन व्यवसाय उभारणी करता कर्जपुरवठा देण्यासाठी अग्रेसर भूमिका घेतली जाईल असे मत बुद्धिजम अर्बन मल्टिपल निधी लिमिटेडचे अध्यक्ष ऍड.बाबासाहेब दगडू भालेराव, मुख्य व्यस्थापाकीय संचालक राहुल माने यांनी उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.
समाजाप्रति असणारी बांधिलकी याची जाणीव ठेवत बुद्धिजम अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड ही केवळ आर्थिक क्षेत्रात नव्हे तर भविष्यात सामाजिक क्षेत्रात संविधान प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यक्रमांमध्ये आग्रही सहभागी लावील असेल असे मत निधी बँकेचे संचालक रोहित गुप्ता, एकनाथ निकम,किशोर वनखंडे, स्नेहल जाधव यांनी व्यक्त केले. या उदघाट्न प्रसंगी संविधान प्रतिष्ठानचे सचिव ऍड.गिरीश दिवाणजी, नितीन उबाळे, सुमित रुके, अविनाश कापसे, दीपेश येलवे व पी. डी. हॉस्पिटल, विरारचे सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रम स्थळी आरोग्य शिबीर यशस्वीरित्या पार पाडले.




