मुंबई — बहुजन महापार्टीचे युवा नेते साजिद खान यांनी महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री मा.ना. श्री. आशिष शेलार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत महसूल न्यायालयातील निर्णय EQJCOURT या वेब प्रणालीवर त्वरित अपलोड करण्याबाबत महत्त्वपूर्ण मागणी त्यांनी मांडली.

साजिद खान यांनी सांगितले की, राज्य शासनाने नागरिकांना न्यायालयीन माहिती घरबसल्या मिळावी यासाठी EQJCOURT ही वेब प्रणाली तयार केली आहे. या प्रणालीत महसूल न्यायालयीन निर्णय, प्रकरणांची पुढील तारीख व संबंधित तपशील अपलोड करण्याची जबाबदारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर आहे. मात्र, अनेक ठिकाणी अधिकारी ही माहिती वेळेत अपलोड करत नसल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे व शासनाच्या उद्दिष्टांना बाधा येत आहे.

“या गंभीर मुद्द्यावर त्वरित पावले उचलून नागरिकांना पूर्णपणे ऑनलाइन सुविधा देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश देण्यात यावेत,” अशी मागणी साजिद खान यांनी केली.

यावर मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

साजिद खान यांनी स्पष्ट केले की, “महसूल न्यायालयीन निर्णय आणि प्रकरणांची पुढील तारीख ऑनलाइन उपलब्ध झाल्यास नागरिकांना पारदर्शक, वेगवान आणि सुलभ सेवा मिळेल. हीच बाब लक्षात घेऊन आम्ही थेट मंत्र्यांकडे मागणी पोहोचवली आहे.”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *