
विरार (पूर्व)मनवेल पाडा परिसरातील ज्ञानदीप शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांना “समृद्ध चॅरिटेबल ट्रस्ट” संस्थेच्या माध्यमातून आणि “भीमआर्मी”, नालासोपारा शाखा,संघटनेच्या सहयोगातून शैक्षणिक साहित्य, शालेय आणि शाळाबाह्य इयत्ता दहावी विद्यार्थ्यांकरिता वितरण करण्यात आले. याप्रसंगी ज्ञानदीप क्लासेस संचालक श्री दीपक भरणकर सर सातत्याने १०वर्ष इयत्ता सातवी- आठवी पर्यंत जेमतेम शिक्षण झालेल्या, घरातील शैक्षणिक वातावरण नसलेल्या , तसेच अनेक पालकांना शिक्षणाचा गंध नसलेल्या ,मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब उपेक्षित, वंचित, अज्ञान काही प्रसंगी व्यसनाधीश अंधश्रद्ध ,आबालवृद्ध अशा पालकांच्या पाल्यांना शिक्षणाची संधी मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा उपेक्षित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणि सशक्त, सबळ समाज घडविण्याचे काम श्री दीपक भरणकर सर सातत्याने करत आहे. अशा समाज उपयोगी कार्य करणाऱ्या भरणकर सरांच्या ज्ञानदीप क्लासमधील तसेच, त्यांचे सहकारी शिक्षक आचरेकर सर यांना “समृद्ध चॅरिटेबल ट्रस्टच्या” माध्यमातून त्यांच्या भरीव सामाजिक कार्याचे योगदान म्हणून सन्मानजनक भेटवस्तु देण्यात आली. त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रात वाहून घेतलेल्या सामाजिक कार्याला समृद्ध चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक सुभाष रा. जाधव यांनी विशेष कौतुक केले. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचा आदर्श घ्यावा असे आपल्या भाषणातून मत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे सभासद – शिलेदार दिनेश दाभोळकर ,राजेश मोरे ,दर्पण यांनी विशेष प्रयत्न परिश्रम घेतले. आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
