पुणे – केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड कायद्यातील प्रस्तावित सुधारणा याच्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांच्या वतीने सोमवारी (दि. २६ मे २०२५) रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत कोंढवा येथील कौसरबाग मैदानावर मुस्लिम समाजासाठी आणि भारतीय संविधानावर प्रेम करणाऱ्यांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे संस्थापक अध्यक्ष जुबेर मेमन यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमात वक्फ बोर्ड कायद्याविषयी समाजात निर्माण झालेल्या चिंतेवर चर्चा होणार असून, मुस्लिम समाजाच्या भावनांना वाचा फोडण्याचा प्रयत्न होणार आहे.
