नालासोपारा/वसई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आज, २० मे २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उद्घाटन समारंभाचे आयोजन नगीनदास पाडा रमा अपार्टमेंट, शॉप नं. १, गायत्री मंदिरसमोर, नालासोपारा (पूर्व), पालघर येथे करण्यात आले आहे. तसेच भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दुसरा कार्यक्रम एव्हरशाइन सिटी, वसई (पूर्व) येथे घेण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन मा. राहुल सिद्धार्थ शिरसाट यांनी केले असून, मार्गदर्शक म्हणून ऍड.ईश्वर धुुळे साहेब (जिल्हाध्यक्ष – वसई विरार) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत म्हणून मा. संतोष (भाऊ) धुुळे, मा. प्रेमसागर इंगवे (विधानसभा अध्यक्ष – नालासोपारा), मा. श्रीमंत भोरे सर (जिल्हा सरचिटणीस – वसई विरार), मा. राजेंद्र गुते (नालासोपारा – अध्यक्ष), मा. लक्ष्मण शिरसाट, मा. दीपक वाकळे, मा. अमिता वोध, मा. पांडुरंग किरण कोळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या उद्घाटन सोहळ्यामुळे वसई-विरारमध्ये रिपब्लिकन पार्टीच्या कामकाजास अधिक गती मिळणार असून, सामाजिक न्यायासाठी कार्यरत असलेल्या पक्षाला स्थानिक स्तरावर नवे बळ मिळणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *