माणूसकी फॉउंडेशन आयोजित महापुरुषांचा विचाराचा उत्सव कार्यक्रम रविवार दिनांक 27.04.2025 रोजी सायं. 5 ते 9 वाजेपर्यंत विरार पूर्वेला वसई विरार महानगरपालिका वाचनालय येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज भोईर ह्यांनी केले कार्यक्रमाची सुरवात साने गुरुजी व महात्मा फुले ह्याच्या गीताने केली. व प्रथम पेहलगाम काश्मीर ये निष्पाप लोकांच्या भ्याड हल्लात मृत्यूमुखी पडलेल्याना 2 मिनटं उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली आणि घटनेचा निषेध करण्यात आला.कार्यक्रमास वंचित च्या विरार वसई प्रमुख गीता जाधव, सुभोध मोरे लेखक विचारवंत, प्रमुख वक्त्या जया बनसोडे आंबेडकर विषयक प्रभोधनकर्त्या, ऍड गिरीष दिवाणजी, पांडुरंग साळवी, संतोष आंबेकर ओ बी सी नेता, संतोष खरडमोल योग शिक्षक व कवी, रोहिदास समाज नेते सुभाष आंबोकर, प्रकाश गडा, रजनीताई गडा,कार्याध्यक्ष माणूसकी फॉउंडेशन, ऍड किरण म्हात्रे महिला अध्यक्ष माणूसकी फॉउंडेशन, बिजयं गोडबोले, खजिनदार माणूसकी फॉउंडेशन, राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्या वनिता तोडवळकर, प्रमोद तांबे बोद्धचार्य ऍड. सुरेश केदारे, आदी विशेष व्यक्तीं बरोबर बऱ्यापैकी श्रोते उपस्थित होते. कार्यक्रम छान झाला आंबेडकर चळवळी तील फायर ब्रँडब वक्त्या नी उत्कृष्ट मांडणी करून महामानवांचे समता, बंधूता व स्वतंत्रता आणि एकत्र राहण्याच्या विषयक मोलाचे विचार सांगितले. माणूसकी फॉउंडेशन चे अध्यक्ष घनश्याम आंबोकर ह्यांनी सर्व विचारपीठावरील वक्त्यांचे व जमलेल्या श्रोत्यानाचे आभार मानले.
