मीरा भाईंदर: (घनश्याम आंबोकार) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मीरा भाईंदर शहरात एका महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विशेष प्रसंगी महानगरपालिकेच्या माध्यमातून गरजू व निराधार महिलांना आर्थिक मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले.विरोधी पक्षनेत्या तथा नगरसेविका सय्यद आफरीन मुझफ्फर हुसैन यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम त्यांच्याच दालनात पार पडला. वाढदिवसासारख्या आनंदोत्सवावर मोठा खर्च न करता, समाजातील दुर्बल आणि निराधार घटकातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवण्याचा हातभार या उपक्रमातून लावण्यात आला आहे.यावेळी माजी उपमहापौर नूरजहाँ हुसैन (मम्मी जी) यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व आदरणीय नगरसेवक आणि नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना सर्वसामान्यांच्या हिताचे उपक्रम राबवणे हीच खरी जनसेवा असल्याची भावना यावेळी उपસ્થितांनी व्यक्त केली. वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल शहरातून आणि नागरिकांमधून मुझफ्फर हुसैन व सय्यद आफरीन मुझफ्फर हुसैन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
