मुंबई :

‘कामगार नेता’ या हिंदी पाक्षिकाच्या माध्यमातून मुंबई व उपनगर परिसरात पत्रकारितेचा विस्तार करण्यासाठी नुकतीच वसई पश्चिम परिसरात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वृत्तपत्राचे समूह संपादक, मालक तथा प्रकाशक तुषार गायकवाड, कार्यकारी संपादक जावेद नासिर खान आणि प्रबंधक संपादक किशोर जनार्दन मोहिते यांनी उपस्थित पत्रकार मंडळींना मार्गदर्शन केले.मुंबई शहरात पत्रकारिता करताना येणाऱ्या विविध अडचणी आणि आव्हानांच्या संदर्भात कार्यकारी संपादक जावेद नासिर खान यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. मुंबईसारख्या महानगरात वृत्तसंकलन कसे केले पाहिजे, यावर यावेळी खुली व सखोल चर्चा रंगली.​समीर सलीम शेख, सिद्धार्थ श्रीकांत मसूरकर आणि विजय प्रसाद ताम्हणकर या तिन्ही पत्रकारांची समाजसेवेची आवड आणि प्रशासनावरील त्यांचा अभ्यास लक्षात घेऊन, जावेद नासिर खान व किशोर मोहिते यांनी त्यांची ‘कामगार नेता’ पाक्षिकात अधिकृत नियुक्ती केली:

  • समीर सलीम शेख – मुंबई क्राईम रिपोर्टर
  • सिद्धार्थ श्रीकांत मसूरकर – मुंबई (उपनगर) पत्रकार
  • विजय प्रसाद ताम्हणकर – मुंबई सहायक रिपोर्टर
  • मोहम्मद झाकीर सदानी – मुंबई पत्रकार

​बैठकीदरम्यान मार्गदर्शन करताना पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. भविष्यात आपल्याकडून कोणतीही गैरकृत्ये घडणार नाहीत याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली. समाजातील प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून जनतेला अचूक माहिती बातमीच्या माध्यमातून देणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट करण्यात आले.​कायद्याच्या चौकटीत व नियमांचे तंतोतंत पालन करून कायदेशीर रीतीने पत्रकारिता करावी, असे निर्देश देण्यात आले.

https://www.facebook.com/share/v/1DGW9dyvac/
https://www.facebook.com/share/v/1DGW9dyvac/
https://www.facebook.com/share/v/1DGW9dyvac/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed