वसई | विशेष प्रतिनिधी जावेद नासिर खान

​वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील राजीवली, केलीचा पाडा और वाघराल पाडा या परिसरातील नागरिकांना सध्या भीषण नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रशासकीय दुर्लक्षामुळे येथील रस्ते चाळणी झाले असून, सांडपाण्याच्या योग्य निचऱ्याच्या अभावामुळे संपूर्ण परिसरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

​शहराच्या विकासाचे दावे कागदावरच असल्याचे चित्र या भागांत पाहायला मिळत आहे. मुख्य रस्त्यांपासून ते अंतर्गत गल्ल्यांपर्यंत सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य असून, पावसाळा असो वा नसो, सांडपाणी रस्त्यांवरून वाहत असते. परिणामी, वाहनचालक और पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून वाटचाल करावी लागत आहे.

  • खड्ड्यांचे साम्राज्य: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात सत्र सुरूच असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
  • तुटलेली व अस्वच्छ गटारे: ड्रेनेज व्यवस्था कोलमडल्याने सांडपाण्या रस्त्यावर साचून दुर्गंधी पसरली आहे, ज्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
  • विद्यार्थ्यांची हेळसांड: खराब रस्ते और चिखलातून वाट काढत लहान मुलांना शाळेत जावे लागते, ज्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
  • प्रशासन मुग गिळून: अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांकडे तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

​निवडणुकीच्या काळात पायाभूत सुविधांचा कायापालट करण्याचे अभिवचन देणाऱ्या नेत्यांना विजयानंतर या परिसराचा विसर पडला आहे. लाखो रुपयांचा महसूल महापालिकेला देणाऱ्या या भागातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे.

​अनेकदा निवेदने देऊनही महापालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्यास येत्या काळात तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थ व स्थानिकांनी दिला आहे. प्रशासकीय यंत्रणा यावर नेमकी कधी पावले उचलणार, याकडेच आता सर्वांचे डोळे लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed