दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉ. संदेश वाघ यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांची औपचारिक सदिच्छा भेट घेतली.

या भेटीत डॉ. वाघ यांनी माननीय कुलगुरूंच्या यशस्वी कार्यकाळाचे अभिनंदन केले तसेच विद्यापीठाला पंतप्रधान उषा योजना (PM–USHA Yojana) अंतर्गत मिळालेल्या ₹100 कोटींच्या अनुदानाबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या.

शैक्षणिक व संशोधनविषयक विविध मुद्द्यांवर झालेल्या चर्चेत विशेषत: सोलापूर विद्यापीठात “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र” स्थापन करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर भर देण्यात आला. यासंदर्भातील ₹155 कोटींचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती कुलगुरूंनी दिली.

या उपक्रमामुळे विद्यापीठाच्या संशोधन क्षमतेत मोठी वाढ होईल व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक क्षेत्रात नवी दालने खुली होतील, असा विश्वास डॉ. संदेश वाघ यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *