Oplus_131072

​मिरा भाईंदर (उपसंपादक घनश्याम आंबोकर ) :

मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या १६ नगरसेवकांकडून नागरिक व पत्रकारांसोबत झालेल्या कथित गैरवर्तनावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणाची पक्षाने गंभीर दखल घेऊन संबंधित नगरसेवकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ता दीप काकडे यांनी केली आहे.​भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी पक्षांतर्गत जबाबदाऱ्या पार पाडताना जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी जोरदार टीका काकडे यांनी केली. तसेच, “भाजपच्या १६ नगरसेवकांचे निलंबन जिल्हाध्यक्ष दिलीप जैन कधी करणार?” असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.मिरा भाईंदरच्या जनतेचे प्रश्न, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी याकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय पदे सांभाळण्यात कोणताही अर्थ नाही. जनतेने निवडून दिलेल्या नगरसेवकांच्या वर्तनाबाबत पक्ष नेतृत्वाने तातडीने स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे, असे मत दीप काकडे यांनी व्यक्त केले. या प्रकरणी आगामी काळात राजकीय वर्तुळात आणखी खळबळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *