मीरा भाईंदर /उपसंपादक: घनश्याम आंबोकर: काँग्रेसचे नगरसेवक तेरेन मेंडोसा यांचा वाढदिवस स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थकांनी अत्यंत उत्साहात व जल्लोषात साजरा केला. या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

नगरसेवक मेंडोसा यांनी राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल घेत ‘इंडियन प्रेस असोसिएशन’च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला. तसेच त्यांच्या आगामी सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मेंडोसा यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेचे कार्य अधिक जोमाने करण्यासाठी यश लाभो, अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *