Oplus_131072

ठाणे (उपसंपादक घनश्याम आंबोकर ): महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सुमारे अडीच लाख (२,५०,०००) दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळीच्या फराळाचे साहित्य मोफत वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री सरनाईक यांनी ठाण्यातील वर्तक नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

तयारीची स्वतः पाहणी या उपक्रमांतर्गत तयार करण्यात येणाऱ्या फराळ किट्सच्या कामाची पाहणी मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी स्वतः वर्तक नगर येथील ठिकाणी जाऊन केली. किटची गुणवत्ता आणिPacking व्यवस्थेची खात्री केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या योजनेची सविस्तर माहिती दिली.

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, “राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या सणांमधील आनंद द्विगुणीत व्हावा आणि दिवाळीचा सण उत्साहात साजरा करता यावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अडीच लाख शेतकरी कुटुंबांपर्यंत हे फराळ किट पोहोचवून त्यांच्या आयुष्यात दिवाळीचा गोडवा आणण्याचा आमचा हा एक लहानसा प्रयत्न आहे.”

या सामाजिक व संवेदनशील उपक्रमामुळे दुष्काळी भागातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, सर्व स्तरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *