गुरुजी

:-

गुरु विचारांचा दिप
सांगे कविता प्रदीप
शाळा जीवन मंदिर
राहा स्वच्छ टापटीप.

ज्ञान पंढरी सांगतो
काळ्या फळ्यावर खडू
शुभ्र प्रकाश पेटवी
बाल पणीचा हा भिडू.

रेघा चित्र रंगवत
शून्य डोक्यात प्रकाश
दावी जल भूमी वर
दाखवतोचं आकाश.

सांगे जीवनात कथा
सदविचारांच्या गाथा
भरे विचारांनी माथा
दुर सारी साऱ्या व्यथा.

शास्र जीवन संगीत
लावी अभ्यासाशी प्रित
करा वंदन गुरूंना
रुजे मनी ज्ञान गित.©️®️

प्रदीप पाटील
गणपूर जळगाव
मो. 9922239055

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *