पुणे (प्रतिनिधी) : सोलंकी परिवार व लष्कर बेडा पंचायत यांच्या वतीने मंगळवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी श्री भगवान गोगादेव मंदिर, पुलगेट कॅम्प, पुणे या ठिकाणी ‘माता रानी सिरीयल नवमी महोत्सव’ अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.या धार्मिक महोत्सवाचे अध्यक्षस्थान श्री भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष तथा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष करण सिंग मकवानी यांनी भूषवले. कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून मेहतर वाल्मिकी महासंघाचे अध्यक्ष रवी भाई परदेशी यांनी जबाबदारी सांभाळली.
मान्यवरांची विशेष उपस्थिती
या सोहळ्यास लष्कर बेडा पंचायतचे अध्यक्ष सुरेशभाई मकवानी, मंदिराचे पुजारी विक्रमजी गोहेर यांच्यासह पंचायतचे पंचप्रमुख व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच नगरसेवक रफिक भाई शेख, माजी नगरसेवक सुधीर दादा जानजोत, स्वराज्य निर्माण सेना पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मन्नूभाई कागडा, दलित मित्र नरोत्तम चव्हाण, ॲड. कबीर बीवाल, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. अनुपम बेगी, मेहतर वाल्मिकी महासंघाचे संस्थापक चंद्रकांतजी चव्हाण यांच्यासह अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
विशेष सत्कार आणि सन्मान सोहळा
कार्यक्रमादरम्यान वीर गोगादेव जन्म उत्सव (बागड) समितीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये मनोज पटेलिया, योगेश चव्हाण, महेंद्र लालबिगे, सतीश शेठ शेट्टी, सुदेश सारवान, बाबूजी बेद, डॉ. दीपक निनारीया, तसेच स्मिता शैलेंद्र जाधव यांचा गौरव करण्यात आला. तसेच श्री भगवान वीर गोगादेव निशान आखाडा भगत यांचाही सन्मान करण्यात आला.
महोत्सवाचे औचित्य साधून १०१ महिलांना साडी, शॉल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
महाप्रसादाचा लाभ
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थित सर्व गोगादेव भक्त व सिरीयल माता भक्तांनी महाप्रसादाचा (भंडारा) मोठ्या संख्येने लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लष्कर बेडा पंचायतचे रवीजी गंगाराम वाघेला (जमदार) आणि रवीजी चंदा यांनी केले.
यशस्वी आयोजनासाठी परिश्रम
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सोलंकी परिवारातील संतोष सोलंकी, प्रवीण सोलंकी, राकेश सोलंकी, मयंक सोलंकी, ऋषी सोलंकी, आकाश सोलंकी, आकाश वाघेला, ध्रुव रवीजी चंदा यांच्यासह सोलंकी, वाघेला, चंदा, घुसर आणि चौहान कुटुंबातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. धार्मिक सलोखा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेल्या या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
