ठाणे: उपसंपादक – घनश्याम आंबोकर
आज २३ सप्टेंबर रोजी प्रेरणास्थान आणि शिक्षण महर्षी डॉ. नानजीभाई ठक्कर तथा जय भगवान शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ठाणे येथील महाविद्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान अत्यंत अतुलनीय असून, हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या या शिक्षण महर्षींना दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली.
या विशेष प्रसंगी ‘माणूसकी फाउंडेशन’चे अध्यक्ष घनश्याम आंबोकर आणि प्रसिद्धी लेखन साप्ताहिकचे संपादक शेषमनी यादव यांनी डॉ. नानजीभाई ठक्कर यांना पुष्पगुच्छ देऊन निरोगी व दीर्घआयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात निरंतर कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींचा असा सन्मान करणे ही सामाजिक बांधिलकीची जपणूक असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले.

