राज्यातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा; १८ राज्यांतील संघांचा सहभाग

मिरा रोड – भाईंदर : घनश्याम आंबोकर

मिरा-भाईंदरच्या क्रीडा इतिहासात प्रथमच एक ऐतिहासिक पर्वणी साजरी होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पी. एस. पी. एल.’ (PSPL) या भव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत देशातील १८ राज्यांतील संघ आपले कसब दाखवण्यासाठी मिरा-भाईंदरमध्ये दाखल होणार आहेत. विजेत्या संघाला तब्बल २१ लाख रुपयांचे भव्य पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

पूर्वेश सरनाईक यांची घोषणा

शिवसेनेचे (शिंदे गट) युवा नेते पूर्वेश सरनाईक यांनी रविवारी मिरा रोड येथील हटकेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी शिवसेना महिला संघटक निशा नार्वेकर आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद भोईर उपस्थित होते. पूर्वेश सरनाईक म्हणाले की, “मिरा-भाईंदरमधील क्रिकेट प्रेमींसाठी ही स्पर्धा म्हणजे एक मोठी मेजवानी असेल. या स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सर्व शासकीय परवानग्या प्रशासनाकडून प्राप्त झाल्या आहेत.”

स्पर्धेचे मुख्य आकर्षण:

  • कालावधी: २४ ते २९ एप्रिल २०२६
  • ठिकाण: नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, भाईंदर
  • विजेता संघ: २१ लाख रुपये रोख
  • उपविजेता संघ: ११ लाख रुपये रोख
  • मॅन ऑफ द सीरिज: मारुती सुझुकी ‘ब्रेझा’ कार
  • इतर पारितोषिके: सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाला ‘ॲक्टिवा’ स्कूटी देऊन सन्मानित केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *