
कालकथित तुकाराम धेंडे प्रतिष्ठान आणि अखिल मंगळवार पेठ पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप तसेच दहावीच्या आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पुणे स्टेशन येथील डॉ, बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनामध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला,
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे होते, माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आला,
यावेळी सुमारे 1000 विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले,
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे, माजी आमदार मोहनदादा जोशी,माजी नगरसेवक मुख्तार शेख, आदि यावेळी उपस्थित होते,
कार्यक्रमाचे आयोजन, युवा नेता विकार अहमद मुख्तार शेख, निनाद धेंडे, जहीर शेख, झाकीर शेख, यांनी केले,
