पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) पर्वती विधानसभा मतदारसंघात बकरी ईदनिमित्त पर्वती दर्शन – पंचशील चौक येथे नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. बकरी ईद हा प्रेम, आपुलकी व बंधुभाव जपणारा सण असून, सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन बंधुतेचे दर्शन घडवावे, असे याप्रसंगी सांगण्यात आले.

या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते आनंद कांबळे, अल्पसंख्याक विभागाचे पर्वती विधानसभा अध्यक्ष जमील शेख, प्रभाग क्रमांक २९ चे अध्यक्ष समीर भाई सय्यद, ज्येष्ठ पदाधिकारी शफी मामू, पुणे शहर उपाध्यक्ष रशीद भाई शेख तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले. बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांशी सलोख्याचे संबंध दृढ करत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *