(प्रतिनिधी : घनश्याम आंबोकर)
मीरा भाईंदर : ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय जवानांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी आणि भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मीरा भाईंदर जिल्हा काँग्रेसतर्फे भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले.
ही यात्रा सिल्व्हर पार्क येथून सुरु होऊन मीरा रोड स्टेशनजवळील शहीद कॅप्टन कौस्तुभ राणे स्मृतीस्थळापर्यंत उत्साहात पार पडली. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रमोद सामंता, उपाध्यक्ष आफरीन सय्यद, युवा अध्यक्ष सिद्धेश राणे, काँग्रेस नगरसेवक, तसेच असंख्य कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते.
यात्रेदरम्यान उपस्थितांनी शहीद कॅप्टन सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर वयमिका सिंग यांचे छायाचित्रे हातात घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. “जय जवान, जय किसान” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
या तिरंगा यात्रेचे आयोजन करून जिल्हा काँग्रेसने भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम केला असून, शहीदांच्या बलिदानाची आठवण ताजी केली.
