



ही वास्तू अत्यंत देखणी, सुसज्ज व गरजांनुसार साकारलेली असून, वाटेगाव ग्रामस्थ आणि अण्णा भाऊ साठे कुटुंबीयांनी रोहित दादा पवार यांचे मन:पूर्वक आभार मानले. हा उपक्रम म्हणजे केवळ निवारा नव्हे तर बहुजन समाजाच्या योगदानाला दिलेला सन्मान असल्याची भावना उपस्थित नागरिकांतून व्यक्त झाली.
या कार्यक्रमाला वाटेगाव पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सामाजिक व राजकीय महत्व अधोरेखित करणारी उपस्थिती लक्षणीय होती. प्रमुख उपस्थितांमध्ये —
- मा. आ. रोहित दादा पवार
- सौ. सावित्रीमाई साठे (स्नुषा अण्णा भाऊ साठे)
- मा. सचिन साठे
- मा. सौ. नंदाताई कीर्तिकुमार चौगुले (सरपंच, वाटेगाव)
- सौ. सोनाली राहुल पाटील (उपसरपंच, वाटेगाव)
- मा. सुधाकर भालेराव, मा. राजू आवळे (माजी आमदार)
- मा. पंडित कांबळे (प्रदेशाध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग)
- मा. देवराज पाटील, मा. प्रशांत शिंदे, मा. ग्याबरीयल तिवडे, मा. संजय भिसे, मा. अरुण कांबळे, मा. सुरेश माने, मा. तुकाराम साळुंखे, मा. अमोल पाटोळे, मा. डॉ. पाटोळे मॅडम, मा. बाळासाहेब कसबे, मा. भारत जाधव, मा. लोंढे (अंबी-जळगाव), मा. मयूर जाधव आणि इतर मान्यवर मंडळींचा समावेश होता.
या उपक्रमामुळे केवळ एका कुटुंबाला नवसंजीवनी मिळाली नाही, तर बहुजन नेतृत्वाने सामाजिक बांधिलकी जपत, प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
