
जनता वसाहत, २४ जुलै २०२५:
स्वर्गीय हमीद इनामदार सर यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त जनता वसाहत येथे पी.एम.पी.एम.एल. बस स्टॉपचे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या बससेवेच्या माध्यमातून “आपला चौक ते शिवाजी नगर” मार्ग क्रमांक १० सुरु करण्यात आला असून, स्थानिक नागरिकांना आता प्रवासासाठी अधिक सुविधा मिळणार आहे.
बस स्टॉपचे उद्घाटन श्री. वसंत तात्या मोरे आणि एसीपी श्री. देविदास घेव्हारे सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या उपक्रमामागे जनसेवक सूरज दादा लोखंडे यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या प्रयत्नातूनच हा उपक्रम साकार झाला असल्याचे नाज हमीद इनामदार यांनी सांगितले.
कार्यक्रमास श्री. निलेशदादा पवार, श्री. समीर दादा पवार, श्री. श्रीकांत गायकवाड, श्री. रवी दादा डुमणे, श्री. नितीन दादा हानमगर, श्री. अमोल दादा जाधव, मज्जिदचे शान नवाब शेख भाई, सरफराज तांबोळी व त्यांचे मित्रपरिवार, समर्थ तोरणे व मित्रपरिवार तसेच इनामदार परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाच्या सोयींमध्ये मोठी सुधारणा होणार असून, कार्यक्रमात सहभागी सर्वांचे नाज हमीद इनामदार यांनी मनःपूर्वक आभार मानले.
