






राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या पर्वती विधानसभा मतदारसंघात डॉ. डी. भास्कर प्रोफेशनल इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात आणि प्रचंड प्रतिसादात पार पडला.
कार्यक्रमास पर्वती विधानसभा अध्यक्ष मा. श्री. शशिकांत भाऊ तापकीर व सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. पंडित कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
🔹 प्रा. डॉ. संदीप दळवी सर यांनी “करिअर उड्डाण 2025” या विषयावर विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करत अनेक शंकांचे निरसन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणातून अनेकांना नवसंजीवनी लाभली.
🔹 मा. श्यामसुंदर दळवी सर (पुणे करिअर अकॅडमी) यांनी UPSC, MPSC, IBPS, बँक, रेल्वे, LIC स्पर्धा परीक्षा, तसेच पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण याविषयी सविस्तर माहिती देऊन युवकांना दिशा दिली.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रतिक पंडित कांबळे यांनी केले होते.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर:
- शैलेंद्रजी जाधव – शहराध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग
- फारुख भाई शेख – कार्याध्यक्ष, पर्वती विधानसभा
- आप्पा आरणे – संघटक सचिव, महाराष्ट्र प्रदेश
- प्राजक्ताताई जाधव – शहराध्यक्ष, ग्रंथालय विभाग
- विद्याताई ताकवले – महिला अध्यक्ष, पर्वती विधानसभा
- अनुपमा ताई अवचिते – महिला अध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग पर्वती
- गीतांजली ताई जाधव, समीर सय्यद, आदित्य साखरे, विनोद भाऊ हानवते, गजेंद्र चांदणे, अभिमन्यू कांबळे, दिनेश चव्हाण, हरीश खुडे व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
