वसई प्रतिनिधी: निर्मळ गौतम नगर गावातील नावाजलेले बँन्जो पथक ड्रम बिट्स मुजिकल ग्रुप यांचा 25 व्या वर्धापन दिन (रौप्य महोत्सव) गौतम नगर निर्मळ गावात उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमात बँन्जो पथक चे जुने व नवीन सर्वच सभासद उपस्थित होते. ड्रम बिट्स मुजिकल ग्रुपचे सर्वेसर्वा नितीन मोहिते (मास्तर) यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आलेल्या संपूर्ण पाहुणे मंडळी यांना भोजनाची सोय सुध्दा केली होती. गौतम नगर गास (निर्मळ) रहिवासी संघा तर्फे नितीन मोहिते व त्यांचे सहकारी यांनी गावासाठी उत्तम सहकार्य केल्या बद्दल सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन नितीन मोहिते व त्यांचे सहकारी यांना सन्मानित करण्यात आले. नितीन मोहिते यांनी आलेल्या बँन्जो पथक चे जुने व नवीन सभासद यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले त्याच प्रमाणे गावातील वरिष्ठ कार्यकर्ते व पाहुणे मंडळी यांना सुद्धा सन्माचिन्ह सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमात मान्यवर चंद्रकांत स. चव्हाण, नरेश तांबे, मंगेश मोहिते, अँड.राकेश चव्हाण, हरेश मोहिते (पत्रकार), अजय चव्हाण असे अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी नितीन मोहिते यांनी आलेल्या सर्व सभासद व पाहुणे मंडळी यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *