वसई(प्रतिनिधी) :बहुजन महापार्टीच्या युवा विंगमध्ये एक महत्त्वाची नेमणूक करण्यात आली आहे. पक्षाच्या युवा नेतेपदी साजिद खान यांची निवड करण्यात आली असून, ही निवड पक्षाच्या भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे पक्षाच्या राष्ट्रीय नेते तसलीमुन्नीसा खान यांनी सांगितले.

या विशेष प्रसंगी राष्ट्रीय नेते तसलीमुन्नीसा खान, राष्ट्रीय अध्यक्ष शमशुद्दीन यांनी साजिद खान यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले. पक्षाच्या नेतृत्वात युवा शक्तीला संधी देण्याच्या धोरणानुसार ही नियुक्ती केली गेल्याचे सांगण्यात येत आहे.

साजिद खान यांनी पक्षाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला असून, सामाजिक प्रश्नांवर त्यांचा ठाम आणि सुसंवेदनशील दृष्टिकोन आहे. नियुक्तीनंतर त्यांनी सांगितले, “पक्षाच्या विश्वासाला योग्य न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. युवकांच्या प्रश्नांवर काम करणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट राहील.”

या नियुक्तीमुळे बहुजन महापार्टीमध्ये नवचैतन्य निर्माण होईल आणि युवा वर्गाला एक नवा दिशादर्शक मिळेल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *