प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन अपेक्षित
विदर्भ प्रतिनिधी, कारंजा
दि 15 फेबुरवरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अमरावती विभागीय संवाद बैठकीचे आयोजन वाशिम येथे १६ फेब्रुवारी रोजी पत्रकार भवन येथे करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वाशिम जिल्हाध्यक्ष बाबाराव पाटील खडसे यांच्या हस्ते होणार आहे.
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे हे उपस्थित राहून पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमधील सामाजिक न्याय विभागाची भूमिका यावर मार्गदर्शन
करणार आहेत. तसेच विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर विचारमंथन होणार असून, अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांचे प्रमुख पदाधिकारी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
■ प्रमुख उपस्थिती आणि मान्यवरांचे योगदान
या संवाद बैठकीला विमुक्त भटक्या जाती जमातीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेभाऊ अवताडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष ज्योतीताई गणेशपुरी, महिला जिल्हाध्यक्षा वैशालीताई मेश्राम आणि
अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष इमरान फकीरावाले यांची उपस्थिती असेल.
तसेच प्रदेश पदाधिकारी अमरावती जिल्हाध्यक्षसुनील कीर्तीकार, यवतमाळ जिल्हाध्यक्ष विजय नगराळे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजेश गवई, अकोला जिल्हाध्यक्ष गजानन भटकर, महानगराध्यक्ष मिलिंद गवई, वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष धम्मप्रकाश गायकवाड, वाशिम जिल्हा महासचिव सुधीर मनवर आणि सर्व तालुका तसेच जिल्हास्तरीय पदाधिकारीही या बैठकीला
हजेरी लावणार आहेत.
■ सामाजिक न्याय विभागाच्या भूमिकेवर भर
पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये सामाजिक न्याय विभागाची भूमिका अधिक ठळक करण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी प्रभावी धोरणे आखणे आणि पक्षसंघटन अधिक बळकट करणे, या मुद्द्यांवर सखोल चर्चा होईल.
या बैठकीचे स्वागताध्यक्ष म्हणून वाशिम जिल्हाध्यक्ष डॉ. रमेश चंदनशिव कार्यभार सांभाळणार आहेत. संपूर्ण विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांनी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

